*डॉ.समता माधवराव पुटवाड हिने MBBS वैद्यकीय क्षेत्रातील मानाची पदवी मिळवली!!*
उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे
उमरी:-शहरातील रहिवासी डॉ.समता साधना माधवराव पुटवाड हिने आपल्या अथक प्रयत्न,जिद्द मेहनत, आणि ५ वर्षाच्या अभ्यासपूर्ण गुणवत्तेने यशस्वीरित्या आज MBBS ही वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पदवी संपादन केली व पुटवाड परिवारातील एकमेव पहिली डॉक्टर होण्याचा बहुमान प्राप्त केला,आपल्या कुटुंबासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे डॉ समता हिने केलेल्या अथक परिश्रमां चिकाटि,जिद्दीचे हे सुंदर फळ आहे तिच्या या यशामागे आई वडीलचे संस्कार मार्गदर्शन व आशीर्वाद यांचा मोठा वाटा आहे
त्याबद्दल समताचे मनःपूर्वक अभिनंदन, आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे.
समता हिचे शिक्षण प्राथमिक शिक्षण नूतन विद्यालय उमरी येथे झाले पुढील शिक्षण १२ वी science जेनिस बॅच यशवंत कॉलेज नांदेड येथे झाले व शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे MBBS प्रवेश वर्ष २०२० घेतला होता.
सदर,MBBS आधुनिक वैद्यकातील (Allopathy)मुख्य डॉक्टर पदवी आहे.MBBS डॉक्टर ही मॉडर्न सायन्स नुसार अनेक प्रकारच्या चिकीत्सा, निदान व उपचार पद्धतींचे एकत्रीकरण असून सातत्याने प्रगत आणि आश्वासक होत जाणारी अत्याधुनिक उपचारपद्धती आहे. हृदयाचे ठोके मोजण्यापासून, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, एक्सरे, MRI, एंजिओग्राफी अनेक प्रकारच्या आधुनिक पद्धती वापरून चिकीत्सा आणि निदान केले जाते. कुठलेही नैसर्गिक घटक किंवा झाड-पाला डायरेक्ट वापरण्याऐवजी त्यातील आवश्यक घटक योग्य पद्धतीने मिळवून, त्याचे परीक्षण करून तो औषध स्वरूपात वापरून रुग्णांवर इलाज केला जातो. MBBS किंवा मॉडर्न सायन्स ही एकमेव "इविडंस बेस्ड" म्हणजे पुराव्यानिशी सिद्ध होणारी उपचारपद्धती असून ह्यामधे उपचारपूर्व परीक्षण आणि उपचार पश्चात परीक्षणातील फरक दाखवून परीणाम सिद्ध करता येतात. पोलीओ, देवी पासून ते आजच्या काळातील कोरोना पर्यंत अनेक असाध्य आजारांवर मॉडर्न सायन्सने निर्णायक विजय मिळवून दाखवला आहे.हि पारंपारिक आणि मुख्यधारा वैद्यकीय प्रणाली अंतर्गत एक पदवी आहे. MBBS डॉक्टर अती आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतींवर आधारित असतात. ज्यामध्ये रोगांचे निदान आणि उपचार, शस्त्रक्रिया आणि औषधोपचार यांचा समावेश असतो. हे डॉक्टर सामान्यतः शाळा आणि महाविद्यालयात 5-6 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करतात आणि त्यानंतर इंटर्नशिप करतात. हा प्रकार पुस्तकी माहितीचा वापर प्रत्यक्ष करणे असतो.
अश्या अभ्यासात डॉ.समता माधवराव पुटवाड हिने केलेल्या अथक परिश्रम घेत MBBS वैद्यकीय क्षेत्रातील मानाची महत्वपूर्ण पदवी मिळवली आहे.
तिचे वडील माधव पुटवाड हे शिक्षक आहेत तर आई सौ.साधना माधवराव पुटवाड शिक्षीका म्हणून कार्यरत आहेत.
व सुजय माधवराव पुटवाड यांची बहीण आहे.
हा कार्यक्रम नांदेड येथील शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज (डॉक्टरेट दीक्षांत) येथे समारंभ पार पडला आहे.
डॉ समताचे हीचे यश पाहण्यासाठी पुटवाड मित्र परिवार पदवी समारंभाला बहुसंख्य उपस्थित होते.
डॉ समता हीचे उमरी तालुक्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.x


