नवी मुंबई : हिंदूसम्राट प्रतिनिधी :विरेंद्र म्हात्रे :
खालापूर तालुक्यातील स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय खरवई हे आदिवासी विभागा मधील शाळा असून विद्यालय गेली अनेक वर्ष सुरू आहे. विद्यालयामध्ये मुलींसाठी व मुलांसाठी शौचालयाची अत्यंत आवश्यकता होती त्याबाबत विद्यालयाचे किशोर सणस सर यांनी ह. भ.प. परशुराम माळी यांना शौचालयाबाबत विनंती केली असता ह.भ.प. परशुराम माळी यांनी त्यांचे सहकारी पवार सर यांच्या पुढाकाराने empowHAR या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यालयास एक सुसज्ज असे शौचालय बांधून दिले.
सदर शौचालयाचे उदघाटन empowHAR संस्थेच्या मॅनेजर सौ. दीप्ती हजारे मॅडम. व ह.भ.प.श्री परशुराम माळी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी संस्थेचे श्री सुरज सर. श्री पवार सर., सचिन बांधल सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हिंगडे, दावभट सर, सणस सर, खोपडे सर, घोसाळकर मॅडम, सुरवसे मॅडम, चौधरी सर,आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना आमची शौचालयाची सर्वात मोठी समस्या दूर झाल्याने मुख्याध्यापक यांनी श्री माळी साहेब व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.


