वेतवडे/गोगवे उपसरपंचपदी नंदा प्रकाश दळवी यांची बिनविरोध निवड

हिंदू सम्राट बातम्या
0


कळे हिंदूसम्राट प्रतिनिधी अनिल सुतार

वेतवडे ता.पन्हाळा येथील वेतवडे-गोगवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वेतवडे गावच्या नंदा प्रकाश दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.भूतपूर्व उपसरपंच संगीता शिवाजी कांबळे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवार दि 1 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता सरपंच रेखा अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती.यावेळी उपसरपंच पदासाठी नंदा प्रकाश दळवी यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा ग्रामपंचायत अधिकारी सुचित्रा कुंभार यांनी केली. नंदा दळवी या पती प्रकाश दळवी यांच्या बरोबर येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. त्यांना सूचक म्हणून महादेव वीर यांनी स्वाक्षरी केली. निवडीनंतर गावातील ग्रामदैवत श्री ज्योतिबा मंदिरात सर्वांकडून दर्शन घेण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, महादेव वीर,संभाजी गुरव,संगीता कांबळे, रेश्मा अंकुश पाटील यासह सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच जयसिंग पाटील,केदारलिंग सेवा सोसायटीचे चेअरमन रघुनाथ हरी पाटील,व्हा चेअरमन भिकु कृष्णा पाटील,
दगडू दळवी, तंटामुक्त अध्यक्ष विलास पाटील,मा चेअरमन बाबु महादेव दळवी,मा.व्हा चेअरमन रामचंद्र दळवी, बाजीराव रामजी पाटील, शंकर पाटील सावकार, दत्त डेअरी सदस्य बाळु ज्ञानु पाटील,
सोसायटी मा.चेअरमन शिवाजी ज्ञानु पाटील, डॉ दिलीप माने, आनंदा पांडुरंग दळवी सोसायटीचे सर्व संचालक गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top