*गॅस आणि इंधनचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या आमदार समाधान आवताडे यांच्या सूचना

हिंदू सम्राट बातम्या
0

 *गॅस आणि इंधनचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या आमदार समाधान आवताडे यांच्या सूचना


!* 


*(आमदार आवताडे यांनी साधला गॅस एजन्सी प्रतिनिधी, पेट्रोल पंप चालक आणि प्रशासना बरोबर संयुक्तसंवाद)* 



 *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 


पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात गॅस आणि इंधनचा सुरळीत पुरवठा सुरू ठेवण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी गुरुवारी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील प्रांत अधिकारी व दोन्ही तालुक्यातील तहसीलदार, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी आणि पेट्रोल पंप चालक यांची मंगळवेढा येथे बैठक घेतली. 

याप्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघात गॅस आणि इंधनचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी पंढरपूरचे प्रांत अधिकारी सचिन इथापे, मंगळवेढ्याचे बी, आर, माळी, पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे, मंगळवेढ्याचे तहसीलदार मदन जाधव, सभापती दिपाली ताड, जिल्हा परिषद सदस्य रमेश भांजे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर , उपनगराध्यक्ष येताळा भगत,जिल्हा परिषद सदस्य करुणा शिवशरण,अनिल नागटिळक , अरुण नागटिळक यांच्यासह गॅस एजन्सीचे प्रतिनिधी तसेच पेट्रोल पंप चालक उपस्थित होते. 


आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाबरोबर राज्यातही गॅस आणि इंधनचा तुटवडा भासू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांना समस्यांशी सामना करावा लागत असून हॉटेल व्यावसायिकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.

देवभूमी पंढरपूर आणि संत भूमी मंगळवेढा येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात येथे येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता हॉटेल व्यवसायिकांना आणि स्थानिक नागरिकांना गॅस आणि इंधनचा सुरळीत पुरवठा व्हावा. यासाठी गुरुवारी आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथे पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील तहसीलदार, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी आणि पेट्रोल पंप चालकांची बैठक घेऊन मतदार संघात गॅस आणि इंधनचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना केल्याने सर्वसामान्य नागरिकांना आणि हॉटेल व्यवसायिकांना दिलासा मिळणार आहे.

  • जरा जुने

    *गॅस आणि इंधनचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या आमदार समाधान आवताडे यांच्या सूचना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

Pixy Newspaper 11 Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are availabl…
To Top