उरण खोपटे पाटील पाडा गावांतील, गौरापूजन सोहळा एक पर्वणी !

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 19/9/2026

उरण खोपटे पाटील पाडा गावांतील, गौरापूजन सोहळा एक पर्वणी !



पत्रकार / पूजा चव्हाण.

गेली 85 वर्ष गौरापूजन सोहळ्यात रामायण, महाभारत काशीखंड, पांडव प्रताप, शिवलीला अमृत, गणेश पुराणअशा अनेक पौराणिक कथांच्या आधारे एखाद्या आख्यायिकेची निवड करून त्याचावर आधारित चित्र देखावे तयार करीत कथा सादरीकरण करण्याची परंपरा उरणातील खोपटेपाटील पाडा गावात आजही कायम आहे. काहीसा बदल म्हणून बदल म्हणून मध्यंनत्रीच्या काळात काहीसा बदल म्हणून छत्रपतीशिवाजी महाराज्यांच्या स्वराज स्थापनेचा देखावा रोहीडेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ असे देखावेसादर करण्यात आले आले होते, आजही खोपटेपाटील पाडा गावांतील ग्रामस्थांनी आणि युवकांनी आपल्या पूर्वजांनी सुरु केलेली शिवगौरापूजनाचीपरंपरा अखंडीत पणे सुरु ठवली आहे.



भाद्रपद शुद्धचतुर्थीला घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होते, घराघरांतून गणरायाचे स्वागत होत असतना पृथ्वीतलवर जल्लोषात होणाऱ्या स्वागतात गुंग झालेल्या आपल्या बाळाला परत नेण्यासाठी गौराईमाता भाद्रपदशुद्ध सप्तमीस न विसरता येते या गौराईमातेच्य स्वागतालाही आपण सारे सज्ज असतोचपरंतु शिव पुराणांतील संदर्भ केवळ गौरी-गणपतीचे आगमन झालेले दाखवत नाही तरव आपल्या पत्नीआणि पुत्राचे पृथ्वीतलवरील स्वागत पहाण्यासाठीभगवान शंकरही भाद्रपदशुद्ध अष्टमीला पृथ्वीतलवर येतात ही आख्यायिका असली तरी भगवान शंकराचीगौरा पूजाभाद्रपद शुद्ध अष्टमीला करण्याची प्रथा आहे.


गेली 85 वर्षे उरणातील खोपटेपाटील पाडा गावात आजही शिवकृपा गौरा मंडळाच्यावतीने सुरु आहे. तत्कालीन दळणवळणाचीस्थिती पाहता खोपटे गाव अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळखला जात असे. खोपटा खाडीमुळे उरण तालुक्याचे झालेले दोन भाग आणि सूर्यास्तानंतर खाडीकिनाऱ्या वरून जाण्या येण्याचा बंद होणारा मार्ग अश्या परीस्थितीत उरणातील खोपटेपाटील पाडा गावात सन 1941 मध्ये रामजी तुकाराम पाटील (मुख्यसंस्थापक), रघुनाथ पोशा पाटील, विश्वनाथ नामा पाटील, जनार्दन गोविंद पाटील, रामभाऊ बाळाराम भगत, दादू सावळाराम पाटील, जगन्नाथ ह्सुराम पाटील, व माजी सरपंच जयराम नारायण पाटीलयांनी आपल्या 20 सहकार्यांसह गणपत गोवर भगत यांच्या निवास्थानीगौरा पूजनाचा सोहळा सुरु केला, आणिआजही खोपटापाटीलपाडा येथे 85 वर्षे कायम आहे, आज अनेक सोयी सुविधाउपलब्ध झाल्याने परंपरेला कोठेही बगलन देतायुवा पिढीने तो तितक्याच ताकदीने पेलला आहे.


सुमारे 17 वर्षा पूर्वी पनवेलचे दानशूर परेशशेठ डेढिया यांनी सुमारे 11 लाख रु. खर्च करून कै. गणपत गोवर भगत यांच्या निवास स्थानाच्या जागेवरशिव मंदिराची निर्मिती केली आहे. 

मंदिरात शिव लिंगाच्या स्थापने बरोबर श्री गणपती व शिव-पार्वतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मंदिरात भाद्रपद शुद्ध अष्टमी ते द्वादशीपर्यंत अर्थात 18 ते 23 सप्टेंबर 2026 या कालवधीत यंदाचा शिव-गौरा पूजन सोहळा संपन्न होत आहे.


या पाच दिवसाच्या कलावधी मध्येदि. 18 सप्टेंबर 2026 रोजी मंदिरात शिव गौरा आगमन, शिव गौरा अभिषेक (पूजन) दुपारी 12 वाजता मध्यान आरती, महाप्रसाद करण्यात येऊन शिव-गौरा जागरण सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. या काळात गौरा अंगात येण्याची प्रथा असल्यानेपूजेच्य अफिल्या दिवसी मंदिरातव मंदिराच्या परिसरात महिलांना प्रवेश निषेध असतो दैनंदिन कार्यक्रमांतर्गत सकाळी 07:00 वाजता आरती, सायंकाळी "याल तर हसाल" हा समाज प्रबोधनप्र कार्यक्रम, चित्रकलास्पर्धा, स्वरप्रल्हादाचे, करा-ओके वाद्यवृंदनृत्यतरंग, भजन-


कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वाद्यवृंद, पारंपारिक नृत्य असे वेगवेगळे कार्यक्रम सादर होणार आहेत. यंदा "मार्कंड या शिवभक्ताचे प्राण नेण्यासाठी स्वतः यमराज येतात परंतु विधात्या कडून अल्प आयुष्य लाभलेला मार्कंड हा ओम नमो शंकराय नमःचा जप करीत मार्कंड, भगवान शंकराच्या पिंडीला मिठी मारून बसला असताना यमराज त्याचे प्राण हरण करण्या करिता फांस टाकून ओढण्याचा प्रयत्न करतात परंतु यमराज शिवशक्ती मुळे फास ओढू शकले नाहीत, आहे पुढे हाच शिवभक्त मुलगा मार्कंड ऋषी म्हणून प्रसिद्ध पावला" असा देखावा सदर करण्या त आला आहे.


या सोहळ्या साठी पंचक्रोशितूनच नव्हेतर मुंबई, नवीमुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातून या शिव-गौरा पूजन सोहळ्या साठी येतात या ठिकाणी सर्वधर्म समभावाची भावना जपली जाते पुढील पांच दिवसात या ठिकाणी भजन-कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा


सत्कार, वाद्यवृंद, पारंपारिकनृत्यअसे वेगवेगळे कार्यक्रम होतात पहिल्या दिवशीच्या पारायणा नंतर गौरा पूजनअसले तरी शेवटच्या दिवसी मात्रपायात चाळ बांधून नाचणाऱ्या बाळ्या नाचाला महत्व आहे. यंदा शाहीर कु. वैदही शेलार व शाहीर रत्नाकर महाकाळ याचा शक्ती तुरा नाचाचा जंगी सामना सादर होणार आहे, नंतर या सोहळ्याची खरी सांगता होते, दुसर्या दिवसी परायणानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या महाप्रसादाचा लाभ खोपटे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संखेने घेतात शिवकृपा मंडळ खोपटे पाटील पाडा आणि ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या वतीने या वर्षी हा पांच दिवसांचा सोहळा दि18-ते 22 सप्टेंबर 2026 पर्यंत उरण, खोपटे-पाटीलपाडा गाव रायगडयेथे साजरा करण्यात येत आहे, मात्र हा सोहळा केवळ ऐकावयाचा नसून तो प्रत्यक्षात पाहून अनुभवायचा असतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top