करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूलमध्ये नारळी पौर्णिमेचा पारंपारिक थाट - कोळी संस्कृतीचे विद्यार्थ्यांनी घडवले जिवंत दर्शन.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 27/6/2026

करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूलमध्ये नारळी पौर्णिमेचा पारंपारिक थाट - कोळी संस्कृतीचे विद्यार्थ्यांनी घडवले जिवंत दर्शन.



करंजा - उरण | पत्रकार / पूजा चव्हाण.

सध्या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला पोहोचला असताना करंजा येथील *द्रोणागिरी हायस्कूल (मराठी माध्यम)* मध्ये देखील नारळी पौर्णिमा मोठ्या पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या वतीने आयोजित या उपक्रमातून कोळी समाजाच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडले.



आज शुक्रवार, दि. 27 ऑगस्ट 2026 रोजी नारळी पौर्णिमा साजरी होत आहे. श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा हा सण कोळी समाजासाठी नववर्षासारखा असतो. पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत व्हावा आणि नव्या मासेमारी हंगामाला भरभराट मिळावी यासाठी दर्याराजा म्हणजेच वरुण देवतेला सोन्याचा नारळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आहे.



याच परंपरेचे औचित्य साधत द्रोणागिरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेत *आकर्षक सोन्याच्या नारळाची प्रतिकृती* साकारली होती. विद्यार्थ्यांनी पारंपरिक कोळी वेशभूषा - बारकरी साडी, सुरका-टोपी परिधान करून कोळीगीतांच्या तालावर ठेका धरला. यावेळी कोळी परंपरा, संस्कृती आणि कोळीगीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.



या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली ती *भव्य मिरवणूक*. द्रोणागिरी हायस्कूलपासून थेट करंजा समुद्रकिनाऱ्यापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात आणि "दर्या माझा भावा, कृपा कर माझ्यावरी" अशा कोळीगीतांच्या तालावर मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.


नारळी पौर्णिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ सुट्टीचा आनंद नव्हे, तर आपल्या कोळी समाजाची पारंपरिक संस्कृती, रूढी-परंपरा आणि समुद्राशी असलेले अतूट नाते यांची माहिती मिळावी, तसेच आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top