हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 15/8/2026
उरण पोलीस ठाण्यात 80 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह - वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण.
पत्रकार :- पूजा चव्हाण.
उरण :- देशभरात आज 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना उरण पोलीस ठाण्यातही देशभक्तीमय वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला.
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगदीश शेलकर यांच्या हस्ते आज सकाळी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ध्वजाला सलामी दिली.
पावसाची रिपरिप सुरू असतानाही पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत म्हणून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या थोर स्वातंत्र्यसैनिकांना आणि शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि पोलीस दलाची देशसेवेप्रती असलेली निष्ठा व कर्तव्याचा पुनरुच्चार केला. कायदा व सुव्यवस्था राखताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उरण पोलीस सदैव तत्पर राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्याला पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार तसेच काही नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.





