फर्दापूर वनक्षेत्रात अवैध बांबू वृक्षतोड प्रकरणी एकास अटक; दोन मोटारसायकली जप्त.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 9/7/2026

फर्दापूर वनक्षेत्रात अवैध बांबू वृक्षतोड प्रकरणी एकास अटक; दोन मोटारसायकली जप्त.


सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय काळे 

सोयगाव:- तालुक्यातील फर्दापूर वनक्षेत्रात अवैधरित्या बांबूची वृक्षतोड केल्याप्रकरणी वन विभागाने मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गौस खा कासम खा पठाण (वय ४५, रा. फर्दापूर) याला अवैध बांबू वृक्षतोड प्रकरणी अटक करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपीच्या घरी जाऊन कारवाई करण्यात आली असून,अवैध कृत्यात वापर झाल्याचा संशय असलेल्या दोन मोटारसायकली वन विभागाने ताब्यात घेतल्या.जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एमएच-२० डीवाय ८६५९ आणि एमएच-१९ बीके-१०६३ या क्रमांकाच्या मोटारसायकलींचा समावेश आहे. दोन्ही वाहने पंचनामा करून वन विभागाच्या ताब्यात घेण्यात आली आहेत.

या प्रकरणी वन विभागाकडून पुढील तपास सुरू असून, वनसंपत्तीची अवैध वृक्षतोड व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारच्या अवैध कृत्यांची माहिती तत्काळ वन विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हि कारवाई उपवनसंरक्षक सुवर्णा माने,सहायक वनसंरक्षक स्वप्नील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली

वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नरे,एस.एस.सपकाळ, वनरक्षक जे.के.ठोके,सविता सोनुने,भारती बेरड,आश्विनी रामगव्हाणे,अशोक दोडके, सिद्धार्थ वैद्य,योगेश साळवे, प्रवीण गवळी,विजय देवकर, जीवन दोंडे,दिनेश वाघ,तसेच वनमजूर राजू झोडे,भास्कर शहाणे,जगदीश शेख, समदनी,कृष्णा सावळे आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top