प्रबोधनकार ठाकरे हायस्कूलमध्ये नवागतांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 18/6/2026

प्रबोधनकार ठाकरे हायस्कूलमध्ये नवागतांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार.



राधानगरी हिंदूसम्राट प्रतिनिधी संजय कांबळे

राधानगरी तालुक्यातील दूधगंगानगर येथील श्री सरस्वती शिक्षण प्रसारक संस्था संचलित प्रबोधनकार ठाकरे हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच दहावीतील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.




चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता आठवी, नववी व दहावीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता दहावी परीक्षेत राधानगरी केंद्रात द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या तसेच शाळेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या रोहिणी नाटेकर, नीलम घुरे व संजीवनी पाटील यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्ही. बी. सरावणे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सरावणे यांनी सांगितले की, गेली ३० वर्षे शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून शैक्षणिक, कला व सांस्कृतिक क्षेत्रातही शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसह संस्कार आणि शिस्त यांनाही महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नितीन पाडळकर, सखाराम नाटेकर, बी. एन. पाटील, बळवंत पाटील, रणजित चव्हाण, दत्तात्रय पाटील, संजय कांबळे, तानाजी मोहिते, निवास कांबळे, पालक पांडुरंग नाटेकर, दिनकर पाटील, बबन घुरे, बाबुराव शेळके यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व आभार अंकुश पाटील यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top