बापूसाहेब पवार प्राथमिक शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात; ढोल-ताशा, रांगोळी आणि पाऊलठसांनी नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 16/6/2026

बापूसाहेब पवार प्राथमिक शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात; ढोल-ताशा, रांगोळी आणि पाऊलठसांनी नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत.


पुणे प्रतिनिधी अनिल गवळी यांच्याकडून 

पुणे, 15 जून 2026 - भवानी पेठेतील पुण्यश्लोक जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब पवार प्राथमिक शाळेत शालेय वर्षाचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.प्रवेशोत्सव निमित्ताने शाळेच्या परिसराला सजावट करण्यात आली होती. फुगे, पानाफुलांची तोरणे, रंगोळ्या आणि फोटो फ्रेम लावून शाळा सजवण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करून डोक्यावर मुकुट ठेवून त्यांचा सत्कार करण्यात आला. नव्या पिढीच्या आगमनाचे प्रतीक म्हणून विद्यार्थ्यांच्या पाऊलांचे ठसेही घेण्यात आले.या कार्यक्रमाला शाळेच्या सचिव कविताताई पवार, मुख्याध्यापिका कामिनी शेंगाळे आणि पालक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, चॉकलेट आणि पेन्सील यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार म्हणून पुलाव व शिरा देण्यात आला.

कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षिकांनी केले, तर मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका कामिनी शेंगाळे यांनी केले.1961 मध्ये स्थापन झालेल्या बापूसाहेब पवार प्राथमिक शाळेत यंदाही विद्यार्थ्यांच्या आनंदी स्वागताने शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top