हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 9/6/2026
कोथळा येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; २० जण जखमी, उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.
हदगाव -प्रतिनिधी भगवान कदम
तालुक्यातील कोथळा गावात किरकोळ कारणावरून झालेल्या जुन्या वादाचे पर्यावसान गुरुवारी सकाळी दोन गटांतील रक्तरंजित हाणामारीत झाले. काठ्या आणि दगडांचा वापर करून झालेल्या या हल्ल्यात दोन्ही गटांतील एकूण २० जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी गावात किरकोळ कारणावरून वाद झाला होता, जो गावकऱ्यांनी मध्यस्थी करून मिटवला होता. मात्र, ८ जून २०२६ रोजी सकाळी दूध काढून परतत असताना पुन्हा या दोन शेतकरी कुटुंबांमध्ये वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन एकमेकांवर काठ्या आणि दगडांनी जोरदार हल्ले करण्यात आले.
या मारहाणीत काहींना मुक्कामार लागला आहे, तर काहींच्या डोक्यातून आणि पायातून रक्तस्त्राव होत आहे. एका जखमी व्यक्तीच्या पोटातूनही रक्तस्त्राव होत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. जखमींना तत्काळ उपचारासाठी हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टर रवी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शंभर वर्षांपूर्वीचा रस्ता अडवून समोरचा गट आम्हाला मारहाण करत असून, जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप वानखेडे कुटुंबीयांनी केला आहे.
घरावरील पाण्याची टाकी भरत असताना बॅटरीचा उजेड पडल्याच्या संशयावरून त्यांनी आमच्यावर हल्ला केल्याचा दावा चव्हाण कुटुंबीयांनी केला आहे.
या हाणामारीत एकूण २० जण जखमी झाले आहेत:चव्हाण गट (१२ जण) रवीकुमार चव्हाण (४०), देवराव चव्हाण (५५), ऋतिक चव्हाण (१६), अभिषेक चव्हाण (२१), बाळू चव्हाण (३५), रावसाहेब चव्हाण (४५), अरविंद चव्हाण (३०), शुभम चव्हाण (२७), साईनाथ चव्हाण (२६), साहेबराव चव्हाण (६०), वंदना चव्हाण (४५) आणि शकुंतला चव्हाण (५५).
वानखेडे गट (८ शंकर वानखेडे (४४), साहेबराव वानखेडे (३२), शिवाजी वानखेडे (४६), योगेश वानखेडे (२५), जनार्दन वानखेडे (८०), शिवाजी वानखेडे (४५), सुरेखा वानखेडे (४५) आणि बालाजी वानखेडे (६०).
सध्या दोन्ही गटांतील जखमींवर उपचार सुरू असून, या घटनेची अधिकृत नोंद पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.


