हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 4/5/2026
"सेवाव्रती व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा : उरणच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमधील सिनियर डॉक्टर बाबासो काळेल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा"
पत्रकार / पूजा चव्हाण
उरण, 4 जून 2026 : रुग्णसेवेला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले उरण येथील इंदिरा गांधी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्री. बाबासो काळेल यांचा वाढदिवस मंगळवारी हॉस्पिटल परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ. काळेल यांनी गेली अनेक वर्षे उरण तालुक्यातील हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना नवजीवन दिले आहे. गरजू रुग्णांसाठी 24 तास उपलब्ध असणारे, आपुलकीने बोलणारे आणि अचूक निदान करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील अनेक तरुण डॉक्टर घडले आहेत.
यावेळी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक, सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व कर्मचाऱ्यांनी डॉ. कळेल यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. "डॉ. काळेल सर म्हणजे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा उरणकरांना कायम मिळत राहो," अशा भावना यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
रुग्णांनीही डॉ. काळेल यांच्या निरामय आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. "डॉक्टर साहेबांमुळे आम्हाला देव भेटला," अशी कृतज्ञता अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
इंदिरा गांधी हॉस्पिटलच्या वतीने आणि समस्त उरणकरांच्या वतीने तसेच दैनिक हिंदुसम्राट परिवाराच्या वतीने डॉ. काळेल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या हातून अशीच अविरत रुग्णसेवा घडत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.


