शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 3/5/2026

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयतीनिमीत्य  नऊ गावातील आरोग्य शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद.डाॅ.बि.के.निळे यांच्यासह सहकाऱ्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक.


हिंदू सम्राट हादगाव भगवान कदम

आपल्या कार्यकाळात महिला सक्षमीकरण समाजउपयोगी कार्य न्यायप्रिय शासन राबवित अनेक  मंदिराचा जीर्णोद्धार करण्या-या  लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जंयतीनिमीत्य हदगांव शहरात नवजीवन हॉस्पीटल च्या माध्यमातून खाजगी  वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डाॅ.बि.के.निळे डोंगरगावकर यांच्या आयोजनातुन आपल्या मित्र मंडळातील डाॅ.श्याम दळवी डाॅ. ऋतुजा दळवी, डाॅ. गौरी रावते मॅडम ,डाॅ. शिवानी जयस्वाल मॅडम, डाॅ.शुभम नाईक डाॅ.कोमल शुभम नाईक चिंचगव्हानकर डाॅ.मिजगर, डाॅ. दिनानंद निमडगे डाॅ.पिराजी पवार डॉ.रामकिशन गंगासागर डाॅ.गजानन कदम पळसेकर डाॅ.विलास तिवडे खरबीकर यांच्यासह   विविध तज्ञाच्या उपस्थितीत केमिस्ट निरंजन दहेकर श्री लॅब चे संचालक शुभम पावडे संबंधित गावातील प्रतिष्ठित युवक वर्गाच्या सहकार्यातून 28 मे ते 4 जुन या कालावधीत 9 गावामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराला  डोंगरगाव डोरली पिंगळी रुई निवघाबाजार केदारनाथ सह सातवे शिबीर दोन जुन रोजी पळसा येथे तर आठवे शिबीर तिन रोजी बरडशेवाळा येथील मोफत शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात ग्रामीण भागात मिळालेल्या वैद्यकीय सेवेबद्दल गावक-याकडुन तोडंभरुन कौतुक व्यक्त होत आहे. चिंचगव्हान येथे चार जुन रोजी नवव्या शिबीराने उदिष्ट पुर्ण करण्यात येणार असल्याचे आयोजक डॉ.बि.के.निळे यांनी सांगीतले.

  बरडशेवाळा येथे उपस्थितांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करून डाॅ.बि.के.निळे  यांच्यासह कवी भुमिपुत्र श्रीनिवास मस्के यांच्या कार्यावर प्रकाश टाकत महापुरुषानी सर्व धर्मासाठी केलेले कार्य आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगीतले.यावेळेस वैद्यकीय अधिकारी डॉ.के.सी.बरगे सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे पळसेकर, अवधूत चोंढेकर रुईकर, विठ्ठलराव मस्के पळसेकर, राम मस्के गारगव्हानकर ,यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक वर्गासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. शिबीरासह विविध कार्यक्रम यशस्वीतेसाठी गंगाधर मस्के विश्वनाथ मस्के गोविंद मस्के यांच्यासह युवक वर्गानी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top