शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

          हिंदुसम्राट न्यूज 

राधानगरी–दाजीपूर अभयारण्यात गाईड प्रशिक्षण; पर्यटनाला नवी चालना...

राधानगरी प्रतिनिधी / संजय कांबळे.



      राधानगरी-दाजीपूर अभयारण्य येथे पर्यटकांना अधिक समृद्ध, माहितीपूर्ण व दर्जेदार अनुभव देण्यासाठी गाईड आणि सफारी चालकांच्या प्रशिक्षणाला विशेष महत्त्व दिले जात आहे. या प्रशिक्षणामुळे पर्यटनवाढीस निश्चितच गती मिळेल, असा विश्वास विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार यांनी व्यक्त केला.



अभयारण्यात कार्यरत गाईड व सफारी चालकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी सहायक वनसंरक्षक प्रियांका भवर तसेच वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीकांत पवार यांनी सांगितले की, गाईड हा पर्यटकांसाठी अभयारण्याचा ‘चेहरा’ असतो. गाईडचे ज्ञान, संवादकौशल्य आणि वर्तन यावरच पर्यटकांचा अनुभव ठरत असल्याने त्यांना दर्जेदार प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने गाईड व सफारी चालकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना ड्रेस कोड देऊन त्याचे मोफत वाटप करण्यात आले.



दरम्यान, वन्यजीव अभ्यासक सुनिल करकरे यांनी अभयारण्यातील जैवविविधता, वन्यजीवांचे वर्तन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रत्येक सजीव आपल्या पुढील पिढीचा विचार करत असतो, असे सांगत त्यांनी माणूस आणि इतर सजीव यांतील फरक स्पष्ट केला. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य-अयोग्य याचा विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.



या प्रशिक्षण कार्यशाळेत अभयारण्य क्षेत्रातील गाईड व सफारी चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे पर्यटकांना अधिक चांगली सेवा व अचूक माहिती मिळणार असून राधानगरी–दाजीपूर अभयारण्यात पर्यटनवाढीस नवी चालना मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top