शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0
हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 30/5/2026

नवीन पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन...





पत्रकार / पूजा चव्हाण.


पनवेल प्रतिनिधी : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त सेवाभावी संस्था श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या विद्यमाने ३० वर्षावरील महिलांसाठी कॅन्सर जनजागृती व मोफत कॅन्सर तपासणी शिबिर तसेच सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार दिनांक २ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर विद्यालयात होणार आहे. 

      शिबिरामध्ये विशेषतः गर्भाशय मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि मुखाचा कर्करोग याबाबत जनजागृती व मोफत तपासणी केली जाणार आहे. याशिवाय बीएमआय, रक्तदाब, रक्तातील साखर, डोळ्यांची तपासणी, ईसीजी, रक्त तपासणी, क्षयरोग तपासणी, छातीचा एक्स-रे, फॅमिली प्लॅनिंग सल्ला आदी सुविधा उपलब्ध असतील. तसेच विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्त्रीरोग, अस्थिरोग, बालरोग, नेत्ररोग आणि दंतचिकित्सा विषयक मार्गदर्शन दिले जाणार असून एचपीव्ही लसीकरणाबाबतही माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयुष्यमान आणि आभा कार्ड काढण्याची सुविधा यावेळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी डॉ. अस्मिता घरत (८४५४००९७६६) आणि गौरव कांडपिले (९९२०८६८००८) यांच्याशी संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top