शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 30/5/2026

शहाजी उमाप यांच्या जनसुनावणीत ५५ तक्रारीचे निकारण.



नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड


नांदेड*:दि.३१.पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आज नांदेड येथे जनतेच्या समस्या, तक्रारी आणि अडचणी प्रत्यक्ष ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष जनसुनावणी आयोजित केली होती. दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याची संधी देण्यात आली.या दरम्यान एकूण ५५ तक्रारी त्यांच्या समोर आल्या.

शहाजी उमाप यांनी प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे अत्यंत संयमाने व लक्षपूर्वक ऐकून घेतले.नागरिकांच्या अडचणींचे गांभीर्य समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. केवळ तक्रारी ऐकून घेणे नव्हे, तर त्यामागील वास्तव परिस्थिती जाणून घेऊन न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका नागरिकांच्या विश्वासाला बळ देणारी ठरली.


यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,सूरज गुरव तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस उपअधीक्षक उपस्थित होते. नागरिकांच्या विविध व्यक्तिगत,सामाजिक, प्रशासकीय आणि कायदेशीर अडचणींवर चर्चा करण्यात आली आणि त्या दूर करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.


जनतेशी थेट संवाद साधत शांतपणे आणि आदराने प्रत्येकाचे म्हणणे ऐकण्याची शहाजी उमाप यांची कार्यपद्धती अनेकांना भावली. एका नागरिकाने कृतज्ञतेपोटी त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला.अशा प्रकारच्या सन्मानाची अपेक्षा नसतानाही नागरिकांनी व्यक्त केलेला हा भावनिक आदर त्यांच्या कामावरील विश्वास आणि जनतेप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे प्रतीक ठरला. जनतेची कामे ऐकून घेणे, त्यांचे निरसन करणे आणि नागरिकांचा सन्मान राखणे हीच पोलीस प्रशासनाची खरी ताकद असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top