शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 30/5/2026

उरण नगरपरिषदेतील ५ कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सत्कार; सुनिल कुंभार यांची उणीव कायम भासणार.


(हिंदुसम्राट उरण प्रतिनिधी पूजा चव्हाण यासंकडून )

उरण, ३१ मे २०२६ - उरण नगरपरिषदेतील पाच समर्पित कर्मचाऱ्यांनी ३१ मे २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्वीकारली. प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जबाबदारीने केलेल्या सेवेबद्दल म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियन, उरण युनिटच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये श्री. संतोष रामजी देवरे (वाहनचालक), श्रीमती आशा वसंत कोळी (लिपिक), श्रीमती दिपाली दिपक कांबळे (सफाई कामगार), श्री. सुनिल विठ्ठल कुंभार (वॉचमन) आणि श्रीमती सुजाता सुरेश शिवलकर यांचा समावेश आहे.


या पाचही कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळात उरण नगरपरिषदेच्या विविध विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून प्रशासनाचा भार हलका केला. विशेषतः विद्युत विभागात वायरमन म्हणून काम करणारे श्री. सुनिल कुंभार यांची सेवा उल्लेखनीय ठरली. हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि तत्परतेचा नमुना म्हणून ओळख असले कुंभार साहेब वादळ-वारा, ऊन-पाऊस, थंडी असो किंवा दिवस-रात्र असो, प्रत्येक आपत्कालीन कामासाठी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत असत. त्यांच्या निवृत्तीमुळे नगरपरिषदेत मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांची उणीव कायम भासेल, असे सहकाऱ्यांनी सांगितले.


म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियन, उरणच्या वतीने अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष श्री. संतोष पवार, सरचिटणीस श्री. अनिल जाधव आणि उरण नगरपरिषद युनिटचे सर्व पदाधिकारी यांनी पाचही कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे आयुष्य निरोगी, आनंदी आणि सुखसमृद्धीचे जावो, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.


सेवेला समर्पण आणि कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा आदर्श उरण नगरपरिषदेतील तरुण कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे कामगार नेते संतोष पवार यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top