शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 30/5/2026

देगलूर येथे गॅस सिलेंडर घरपोसेवा देण्याची शिवसेना (ठाकरे) पक्षाची मागणी

गॅस सिलेंडर घरपोच सेवा मिळत नसल्याने वृद्ध पुरुष व महिलांसह सामान्य नागरिकांचे भर उन्हात आर्थिक शारीरिक व मानसिक हाल 


देगलूर :- हिंदूसम्राट प्रतिनिधी शशिकांत पटणे याजकडून.

देगलूर येथील बिरादर गॅस एजन्सीकडून मागील दोन ते तीन महिन्यांपासून गॅस सिलेंडरचा घरपोच पुरवठा बंद असल्याने ग्राहकांना भर उन्हात दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे वृद्ध महिला व नागरिकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असून, गॅस सिलेंडर पूर्ववत घरपोच सेवा सुरू करण्याची मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे केली आहे.  


महेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देगलूर येथील एकमेव बिरादर गॅस एजन्सी दोन महिन्यांपासून गॅस सिलेंडर घरपोच सेवा देत नाही तसेच एजन्सीसमोरच सिलेंडरचे वाटप होत असल्याने तिथे मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे ग्राहकांना कामधंदा सोडून भर उन्हात तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये वृद्ध पुरुष व महिलांसह सर्वसामान्य नागरिकांचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत.  


तरी शासनाच्या नियमानुसार गॅस सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक असताना एजन्सी मालकाने नियम धाब्यावर बसवत गॅस सिलेंडरची घरपोच सेवा बंद ठेवून ग्राहकांचे हाल अपेष्टा, पिळवणूक सुरूच ठेवले आहे. त्यामुळे मा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ गॅस एजन्सी धारकाला आदेश देऊन पूर्ववत सिलेंडर घरपोच सेवा सुरू करावी आणि ग्राहकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  


यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्यासह देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख मा श्री पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख मा श्री भगवान जाधव युवा सेना शहर प्रमुख मा श्री विनोद सोनकांबळे, युवा सेना शहर समन्वयक श्री संतोष कांबळे, सायलूसेठ हनमन्लू शहापूरकर आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top