शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 30/5/2026

आगरी-कोळी फूड फेस्टिवल 3.0’चा भव्य शुभारंभ

७ जूनपर्यंत खवय्यांना पारंपरिक सागरी व्यंजनांचा आस्वाद.



नवी मुंबई : हिंदूसम्राट प्रतिनिधी :विरेंद्र म्हात्रे :

 नवी मुंबई येथील कोर्टयार्ड बाय मॅरियटमध्ये २९ मे रोजी “आगरी-कोळी फूड फेस्टिवल 3.0”चा भव्य शुभारंभ करण्यात आला. आगरी आणि कोळी समाजाची समृद्ध खाद्यसंस्कृती, पारंपरिक चव आणि सांस्कृतिक वारसा आकर्षक पद्धतीने सादर करण्याच्या उद्देशाने या फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.


या फेस्टिवलचे हे तिसरे वर्ष असून, मागील दोन वर्षांत नागरिक आणि खवय्यांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेता यंदाही हा महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला आहे. हॉटेलमधील चौथ्या मजल्यावरील पॅवेलियन रेस्टॉरंट खास आगरी-कोळी थीमवर सजविण्यात आले असून, पाहुण्यांना खाद्यपदार्थांसोबत पारंपरिक वातावरणाचाही अनुभव घेता येत आहे.



उद्घाटन सोहळ्यास हॉटेल व्यवस्थापन, विशेष अतिथी आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक स्वागत, लोकनृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी झाली. पारंपरिक संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नवी मुंबईच्या स्थानिक सागरी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली.

या फूड फेस्टिवलमध्ये स्थानिक मसाले आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेले सागरी खाद्यपदार्थ मुख्य आकर्षण ठरत आहेत. पाहुण्यांना पारंपरिक मासळीचे पदार्थ, खेकड्याची करी आणि आगरी-कोळी चवीने नटलेले विविध खास व्यंजनांचा आस्वाद घेता येणार आहे.



हॉटेल व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले की, या फूड फेस्टिवलचा उद्देश स्थानिक आगरी-कोळी समाजाच्या पारंपरिक रेसिपी, सागरी खाद्यसंस्कृती आणि स्थानिक चव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.


हा फूड फेस्टिवल ७ जूनपर्यंत सुरू राहणार असून, दररोज संध्याकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत खवय्यांना पारंपरिक आगरी-कोळी सागरी व्यंजनांचा आस्वाद घेता येणार आहे.



कोर्टयार्ड बाय मॅरियट येथे आयोजित हा फूड फेस्टिवल केवळ खाद्यपदार्थांचा उत्सव नसून, आगरी-कोळी संस्कृती, परंपरा आणि चवीचा अनोखा संगम ठरत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top