शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 25/5/2026

बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी राज्यव्यापी लढा उभारणारमहाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड.



हिंदसम्राट वृत्तसेवा 

छत्रपती सभाजीनगर - राज्यातील विखुरलेल्या बांधकाम कामगारांना एकत्रित करून त्यांच्या हक्कांसाठी तसेच सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यव्यापी लढा उभारला जाणार असल्याचा निर्धार रविवारी पार पडलेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.महासंघाच्या राज्य अध्यक्षपदी अमोल गायकवाड,कार्याध्यक्षपदी राजकुमार होळीकर, कोषाध्यक्षपदी आनंद भालेराव तर सरचिटणीसपदी असंघटीत बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुहास साका,उमेश अग्निहोत्री,अजय कांबळे,विदर्भ विभागीय अध्यक्षपदी यशवंत झाडे, मराठवाडा विभागीय संघटकपदी अशोक जाधव यांचीही निवड जाहीर करण्यात आली.

राज्य संघटक समितीमध्ये कमलेश दाभाडे, गिरीश साबळे, रत्नपाल डोफे, नितीन दवंडे, चांद शहा, विलास लसुरे आणि सागर कुंभार यांचा समावेश करण्यात आला आहे.

बैठकीत ज्येष्ठ विधीज्ञ यतीन ठोले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम १९९६ अंतर्गत कामगारांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देणे, विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे आणि संघटन अधिक मजबूत करणे हे महासंघाचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top