शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 21/5/2026

करळ फाटा ब्रिजखाली ८० ग्रॅम गांजासह तरुणाला अटक : न्हावाशेवा पोलिसांची कारवाई, २७ हजारांचा मुद्देमाल जप्त; उरणमध्ये कोंबिंग ऑपरेशनची मागणी.


पत्रकार / पूजा चव्हाण.

*न्हावाशेवा, दि. २० मे २०२६ : करळ फाटा ब्रिजखाली गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका तरुणाला न्हावाशेवा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ८० ग्रॅम वजनाचा गांजा व एक मोबाईल असा एकूण २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

न्हावाशेवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा नोंद क्रमांक २०/२०२६ नुसार, दि. १९ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजून ०५ मिनिटांच्या सुमारास करळ फाटा ब्रिजखाली, करळ गाव, ता. उरण, जि. रायगड येथे ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी प्रविण वसंत गावित, वय ३६ वर्षे, पोलीस शिपाई, नेमणूक न्हावाशेवा पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई झाली.

आरोपीचे नाव अनवर जमाल अंसारी, वय २६ वर्षे, रा. जसखार गाव, रत्नेश्वरी मंदिराजवळ, ता. उरण, जि. रायगड असे आहे. आरोपीच्या ताब्यातून २०,००० रुपये किमतीचा हिरवट रंगाचा उग्र वास येणारा, कोरड्या स्वरूपातील बोंडे, दांडे व फुले असलेला संलग्न स्वरूपातील गांजा हा अंमली पदार्थ ८० ग्रॅम वजनाचा प्लास्टिकच्या पिशवीसह जप्त करण्यात आला. तसेच ७,००० रुपये किमतीचा एक काळ्या रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल, ज्याचा आयएमईआय नंबर ८६५७५९०४७०२०४७७ व ६७ असा आहे, तोही जप्त करण्यात आला आहे.

आरोपी अनवर अंसारी याच्याविरुद्ध अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी जवळ बाळगला म्हणून एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८(क), २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद दि. २० मे २०२६ रोजी पहाटे ३ वाजून ३६ मिनिटांनी करण्यात आली. पुढील तपास सपोनि श्रीकांत नायडू, न्हावाशेवा पोलीस ठाणे हे करीत आहेत. 

या कारवाईत वपोनि दिपक सुर्वे व सपोनि श्रीकांत नायडू, न्हावाशेवा पोलीस ठाणे यांनी सहभाग घेतला. गुन्हा दाखल करणारे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक मनोज गूंड, न्हावाशेवा पोलीस ठाणे हे आहेत. न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून अशा प्रकारांवर पोलिसांचे बारीक लक्ष असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

दरम्यान, या कारवाईनंतर उरण परिसरातील नागरिकांकडून पोलिसांकडे महत्त्वाची मागणी होत आहे. उरण शहरातील सर्व पानटपऱ्या, झोपडपट्टी परिसर तसेच पार्किंगसाठी उभ्या राहणाऱ्या ट्रेलरच्या आजूबाजूच्या परिसरात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. अंमली पदार्थांची विक्री व सेवनाचे प्रमाण रोखण्यासाठी अशा ठिकाणी नियमित तपासणी व धडक कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top