शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 19/5/2026

पंचायत समिती परिसरात मधमाशांचा हल्ला; आठ जखमी, दोघांची प्रकृती गंभीर.




राधानगरी हिंदूसम्राट प्रतिनिधी संजय कांबळे.

    राधानगरी पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीजवळील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय परिसरात सुरू असलेल्या कामादरम्यान दुपारी मधमाशांनी अचानक हल्ला चढविल्याने एकच धावपळ उडाली. या घटनेत पंचायत समितीचे कर्मचारी व कामगार अशा एकूण आठ जणांना मधमाशांनी चावा घेतला असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.



  घटनेनंतर जखमींना तातडीने राधानगरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पंचायत समिती परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मधमाशांच्या हल्ल्यामुळे परिसरातील कामकाजही काही काळ विस्कळीत झाले.



 घटनेची माहिती मिळताच कर्मचारी व नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. संबंधित विभागाकडून परिसराची पाहणी करण्यात येत असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top