हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 17/5/2026
सामाजिक कार्यकर्ते शिवसेना तालुकाप्रमुख श्री दिपक ठाकूर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव.
*उरण, दि. १७ ( पूजा चव्हाण ) :
उरण तालुक्यातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख तसेच मा.पंचायत समिती सदस्य श्री दिपक ठाकूर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करतात. दीपक ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील मान्यवर, कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या,
दीपक ठाकूर हे गेली अनेक वर्षे सामाजिक व शैक्षणिक तसेच क्रीडा ,सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत पुढाकार घेणारे, तळागाळातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त बोलताना दीपक ठाकूर म्हणाले की, "कार्यकर्त्यांचे प्रेम आणि जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. समाजासाठी काम करत राहणे हाच माझा वाढदिवसाचा संकल्प आहे. उरणची औद्योगिक क्रांती आणि विकास मोठ्या झपाट्याने होत असताना माझा उरणकर कुठे हरवला जाणार नाही याची काळजी घेईन, यापुढेही लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन."
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी सर्वांनी सदिच्छा व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनर, फलक लावून तसेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या नेत्याला शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री दीपक ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात एक वेगळेच चैतन्य पाहायला मिळाले.


