शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0
हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 16/5/2026


अपघाताची वाट पाहतंय प्रशासन. वाळकी बु. धोकादायक वळणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण काटरी.


 
तालुका प्रतिनिधी हदगाव भगवान कदम -

 झुडपांनी गिळंकृत केला रस्ता जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ ग्रामस्थांचा संताप अनावर आत्ताच एक  हदगांव तालुक्यातील बाळकी बु. गावाजवळील हदगांव हिमायतनगर मुख्य मार्गाकरील धोकादायक वजण सध्या मृत्यूचा सापळा बनत चालले असून, प्रशासनाच्या डिसाळ आणि उदासीन कारभारामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सत्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे संपूर्ण बजण झाकले गेले असून, समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने दररोज अपघाताचा धोका निर्माण होत आहे. मात्र इतकी गंभीर परिस्थिती असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी मात्र अपघात झाल्यावरच जागे होणार का? असा संतार संथाल रागरिक उपस्थित करत आहेत. बाळकी बु. परिसरातील नदीच्या पुलापासून पुढे असलेल्या बळावर झुडपे इतक्या मोठ्या प्रमाणात बाढली आहेत की रस्ताच अरुंद बनला आहे.




 विशेषतः चारचाकी वाहनांसमोर अचानक ट्याकी अथवा इतर बाहने समोर येत असल्याने अनेक वेळा माहनचालकांचा तोल जात असून मोठी दुर्घटना टळत आहे. रात्रीच्या बेवेळी तर या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीवाशी खेळ करण्यासारखे झाले आहे. या विषयावर संबंधित विभागाकडे वाळकी   बु प्रशासक संरपच खंडु पाराजी ठोके यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या माहितीनुसार या धोकादायक वळणामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. काही किरकोळ अपघातही पडले असून, भविष्यात एखादा मोठा जीवघेणा अपधात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनरावाच राहणार असल्याचा इशारा वाचावत ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांनी दिला आहे. उपविभागीय अधिकारी तथा भब्य समाधान निवारण मंडल आष्टी यांना लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनात रस्त्यालगतची काटेरी झुडपे हटविणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरूम टाकणे तसेच धोकादायक वळणावर गतीरोधक उभारणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, नागरिकांच्या जीविताशी संबंधित इतक्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने संताप व्यक्त होत आहे. एकीकडे शासन 'रस्ते सुरक्षा अभियान राबवत असल्याचे सांगते, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील अशा धोकादायक ठिकाणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. लाखो रुपयांची विकासकामे कागदावर दाखवली जात असताना, प्रत्यक्षात नागरिकांना सुरक्षित रस्ताही उपलब्ध होत नसल्याने शासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. "मोड़ा अपघात झाल्यानंतरच अधिकारी घटनास्थळी धाव घेणार का?", "नागरिकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? असे संतम सवाल आता ग्रामस्थ विचारू लागले आहेत. प्रशासनाने वेळीच जागे होऊन या धोकादायक वळणाची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा  ग्रामस्थांच्या वतीने वाळकी ( बु )  संरपच प्रशासक खंडु पाराजी ठोके यांनी संबंधित विभागासह प्रशासनाला दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top