हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 21/9/2026
येवले मळ्यात श्रीराम तरुण मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न; सातव्या दिवशी बाप्पाला भावपूर्ण निरोप.
पत्रकार / पूजा चव्हाण
येवले मळा येथील श्रीराम तरुण मंडळाने आयोजित केलेला सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. ग्रामस्थांच्या एकजुटीतून आणि तरुण कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून हा उत्सव यशस्वी झाला.
यंदाच्या उत्सवात मंडळाने आकर्षक आणि सुंदर देखावा साकारला होता. मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, भजन, रास-गरबा अशा विविध सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ग्रामस्थ आणि मंडळाच्या सदस्यांच्या संमतीने आणि सहकार्याने श्रींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
सात दिवस सुरू असलेल्या या उत्सवात दररोज भाविकांची मोठी गर्दी होत होती. सातव्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात आणि भावूक वातावरणात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याने श्रीराम तरुण मंडळ, येवले मळा यांच्यावतीने सर्व ग्रामस्थ, भाविक भक्त, मंडळाचे सर्व पदाधिकारी, बाल व तरुण कार्यकर्ते तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. बाप्पाचा आशीर्वाद सर्वांवर असाच राहो, अशी भावना मंडळाने व्यक्त केली आहे.




