हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 9/6/2026
"दिलीप पान शॉपवाल्याचा 'विमल'चा घमंड उतरवला! FDA ने दिला 'केसरी' ऐवजी 'काळा' डाग, 52 हजारांचा गुटखा जप्त - 'जुबान केसरी'वाला आता 'तोंड काळे' करून बसला!"
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण, 9 जून 2026 (प्रतिनिधी) : "बंदी असली तरी 'विमल बोलो जुबान केसरी' म्हणत कॅन्सर विकणाऱ्या पानवाल्यांना आता 'खाकीचा केसरी' काय असतो ते दाखवतो," असा दम भरत अन्न व औषध प्रशासनाने रविवारी लाल मैदानातील 'दिलीप पान शॉप'वर धाड टाकली आणि दुकान मालक दिलीप थवळेच्या 'गुटखा साम्राज्याला' टाळेच लावले. दि. 8 जून रोजी दुपारी 3:51 वाजता FDA च्या पथकाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 51,998 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त झाला. "साहेब, हा तर 'दाताला लागलेली' सुपारी आहे," अशी पिपाणी वाजवणाऱ्या दिलीप थवळे, वय 55, रा. काटेआळी, नागाव याच्याविरुद्ध मात्र उरण पोलिसांनी 'तोंडाचा कॅन्सर' विकल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी "साहेब, तिकडं लाल मैदानात 'दिलीप भाई' रोज 'केसरी' जुबान करतायत!" बस्स, मग काय, FDA चे पथक आणि उरण पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन खाडे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद केंद्रे यांनी दुपारी 3:41 ते सायं 6 वाजेपर्यंत करंजा रोडवरील मे. दिलीप पान शॉपवर 'ऑपरेशन क्लीन माऊथ' राबवले. "काय हो, दुकानात एवढा माल कशाला?" असे विचारताच दिलीपभाई म्हणाले, "साहेब, 'शो-पीस' म्हणून ठेवलाय!" पण FDA वाल्यांनी सगळा 'शो'च बंद केला. जप्त केलेल्या मालात विमलचे किंग, बिग व जंबो पॅक, V-1 सुगंधित तंबाखू, राज निवास, KP डबल ब्लॅक, रजनीगंधा, कमला पसंद, तुलसी, बाजीराव, डायरेक्टर स्पेशल असे 33 प्रकारचे 'कॅन्सर फ्लेवर्स' सापडले. एकट्या विमलचे 6714, 4158, 5088, 3292 रुपयांचे 'केसरी स्टॉक' जप्त झाले. "अहो, एवढा माल ठेवलाय, म्हणजे 'गोडाऊन' आहे की पानटपरी?" असा सवाल करताच दिलीपभाईंची बोलतीच बंद झाली.
महाराष्ट्र शासनाने 2012 पासून गुटख्यावर बंदी घातली आहे. "साहेब, बंदी आहे माहीत आहे, पण 'ग्राहक देवो भव'! ते मागत होते म्हणून ठेवलं," असा 'भोळा' बचाव दिलीपभाईंनी केला. पण वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध केलंय की हा माल म्हणजे 'स्लो पॉयझन' आहे. तरीही जनआरोग्याच्या आदेशाला 'खिशात' ठेवून जीवघेणा माल विकणाऱ्या दिलीप थवळेवर भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 223 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26, 27, 30, 59 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. "आता 'जुबान केसरी' नाही, 'हवालात हजेरी' लागणार," असे पोलिसांनी सुनावले. या कायद्यानुसार 6 महिने ते 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 10 लाखांपर्यंत दंड आहे. म्हणजे '52 हजारांचा माल' विकून '10 लाखांचा फटका' बसणार!
गुन्हा नोंद क्रमांक 172/2026 अन्वये रात्री 8:03 वाजता गुन्हा दाखल झाला. तपास सहा. पोलीस निरीक्षक नितीन खाडे करत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांचे लक्ष आहे. उरण पोलीस ठाण्यापासून अवघ्या 1 किमीवर हा 'कॅन्सर कारखाना' चालू होता."जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांना माफी नाही. 'विमल' खाऊन 'कमल' होण्यापेक्षा 'निंबू-पाणी' पिऊन 'निरोगी' रहा. विक्री दिसल्यास FDA ला कळवा, आम्ही 'तोंड काळे' करू." उरणमध्ये भरदिवसा 52 हजारांचा माल सापडणे म्हणजे 'शहरात कॅन्सर वाटत फिरणं' होय. पोलिसांनी इशारा दिला, "पुढचा नंबर तुमचा असू शकतो! 'विमल'वाल्यांनो, 'जेल'ची तयारी ठेवा. कारण विकणारा 'आत' जाईल, आणि खाणारा 'वर' जाईल!"


