उमरी घरकुल योजना मोफत वाळूच्या नावाखाली दिवसरात्र लाखो ब्रास अवैध वाळुची तस्करी!!

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 9/6/2026

उमरी घरकुल योजना मोफत वाळूच्या नावाखाली दिवसरात्र लाखो ब्रास अवैध वाळुची तस्करी!!


उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे 

उमरी:-घरकुल योजना मोफत वाळू वाटप होत आहे मात्र यात मोठ्या प्रमाणात गोदावरी काठा लगत असलेल्या अनेक गावातील वाळू मात्र हजारो ब्रास वाळू तस्करयांनी दिवसरात्र छुप्या मार्गाने वाळुची तस्करी केल्याचा प्रकार दिसत असून या प्रकाराकडे वरिष्ठांनी दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

व तसेच उमरी तालुक्यातील गोदावरी काटा लगत असलेल्या अनेक गावातील गंगेला लागून असलेल्या काठावरील माती उत्खनन करित आहेत.

उमरी तालुक्यातील यंडाळा, कौडगाव,इळेगाव,महाटी,बळेगाव,हस्सा,कावलगुडा,या गावातील जवळपास 25 ठिकाणाहून 300,200, ब्रास 100 ब्रास अशी नाम मात्र रॉयल्टी भरून माती तस्करांनी रात्रंदिवस माती उत्खनन करून मोठ्या प्रमाणात गोदावरी काठ पूर्ण सपाट केले आहे. महसूल विभागाच्या यंत्रणेला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात माती तस्करांनी हजारो ब्रास माती नांदेड सह इतर ठिकाणी वीट भट्टी बनवण्यासाठी उत्खनन करून वाहतूक केली आहे महसूल प्रशासनांना प्रति 240 रुपये ब्रास माती महसूल भरून हजारो ब्रास माती उत्खनन करून वाहतूक केली ज्यामुळे शासनाला करोडो रुपयाचा चुना लावण्यात आला आहे या सर्व प्रकाराकडे एवढी यंत्रणा असून सुद्धा तस्करी झाली कशी प्रश्न पर्यावरण प्रेमींना पडला आहे?

उमरी तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून माती उत्खननाचे केंद्रबिंदू बनले आहे जिल्ह्यातील अनेक वीट भट्टी धारकांनी गोदावरी काटा लागत वीटभट्ट्या टाकल्या आहे तर इतर ठिकाणी माती उत्खनन व वाहतूक साठी उमरी सोयीस्कर ठरले आहे यात महसूल विभागाचे ही सहकार्य लाभत असल्याने रात्रंदिवस मोठे हायवा भरून माती उत्खनन व वाहतूक झाली आहे दरवर्षी असाच प्रकार चालू असून माती घेण्यासाठी एकमेव उमरी तालुका सोईस्कर झाल्याचे बोलल्या जात आहे.


.... साहेब चौकट घेणे


 तालुक्यात घरकुल योजना मोफत वाळू वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे पण यात वाळू वाटप करत असल्याच्या नावाखाली दिवसरात्र अवैध वाळू वाहतूक करीत असल्याच चित्र दिसून येत पण यांना आळा घालण्यासाठी महसूल विभागांचे अधिकारी कर्मचारी मिलीभगत आहेत म्हणून दिवसरात्र अवैध वाळू तस्करी करीत आहेत.

या तस्करांवर कारवाई होईल का?की,आधा तुम्हारा आदा हमारा!! याकडे दुर्लक्षित करणाऱ्या प्रशासनाकडे तालुक्यांतील जनतेच लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top