उमरी शहरात खाद्यपदार्थांसाठी वृतमानपत्राचा सर्रास वापर वृतमानपत्राच्या शाईमध्ये विषारी रसायन जड धातु कर्करोग होण्याची धोका !!

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 9/7/2026

उमरी शहरात खाद्यपदार्थांसाठी वृतमानपत्राचा सर्रास वापर वृतमानपत्राच्या शाईमध्ये विषारी रसायन जड धातु कर्करोग होण्याची धोका !! 


उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे 

उमरी:-वृत्तपत्रात बांधलेले पदार्थ आरोग्यासाठी घातक

रस्त्यावर विक्रेत्यांकडून  खाद्यपदार्थ घेताना विक्रेता वृत्तपत्रातून आपल्याला पदार्थ देत असतो.मात्र हे पदार्थ आपल्या जीवावर बेतू

शकतात.वृत्तपत्रासाठी वापरलेल्या शाईमुळे हे पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. इतकेच नव्हे तर वृत्तपत्राच्या कागदामुळे कर्करोग होवू शकतो असा इशारा भारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने एफएसएसएआय दिला आहे.सदर,उमरी शहरासह तालुक्यातील दुकानात हॉटेलमध्ये,रस्त्यावरील गाड्यावर खाद्यपदार्थ खायला

देण्यासाठी किवा बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा सर्रास वापर होताना दिसून

आहे. मात्र अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्र वापरता येणार नाही, कारण

वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल असते आणि ते

केमिकल धोकायदायक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्न,औषध प्रशासनाने याबाबत नवीन आदेश काढले आहेत.त्यामुळे आता उमरीकरांना असे पदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्र

वापरण्याचे सोडून द्यावे लागणार आहे.हे तुमच्याच आरोग्याला फायदेशीर ठरणार आहे.गरम खाद्यपदार्थामुळे केमीकल विरघळते डायआयब्यूटाइल फटालेट आणि डाइन आयसोब्युटाईल या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी केला जातो. हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात म्हणूनच पदार्थांमधील अतिरिक्त तेल

शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करण्यास सुचवले जाते.ही शाई पोटात गेल्यास पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो.या केमिकलमुळे अनेक पोटाचे विकारही जडू शकतात.

अन्न आणि औषध प्रशासनाने नवे आदेश काढले आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नवे आदेश काढले आहेत,त्यामध्ये त्यांनी खाद्यापदार्थ वर्तमानपत्रात

बांधून देण्यास मनाई केली आहे. हॉटेल चालकांनी, दुकानदारांनी याचे पालन न

केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. आपल्याकडे पुड पोहे, वडे,

भजे पकोडी, पापडी, यासारखे अनेक गरम पदार्थ सर्रासपणे वर्तमानपत्रात बांधून दिले जातात,मात्र त्यातले केमिकल

आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. याबाबतची धोक्याची सूचना

सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथोरिटी ऑफ इंडिया यांनीही या आधीच दिली आहे.

त्यामुळे उमरी तालुक्यातील व्यापारी या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top