शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 1/6/2026

"लेखणीच्या शिलेदाराला सलाम : पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष अशोक म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव"*


पत्रकार / पूजा चव्हाण.

उरण, 30 मे 2026 : उरण तालुक्यातील पत्रकारितेचा आधारस्तंभ आणि पत्रकार उत्कृष्ट समितीचे लढवय्ये अध्यक्ष अशोक म्हात्रे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त संपूर्ण उरण-पनवेल परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी निर्भीड पत्रकारिता आणि नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व म्हणून अशोक म्हात्रे यांची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी समितीच्या माध्यमातून सातत्याने लढा दिला आहे. प्रशासनाच्या चुका उघडकीस आणताना त्यांनी कधीही दबावाला भीक घातली नाही.


आज वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव आणि हितचिंतकांनी त्यांच्या निवासस्थानी तसेच फोनवरून शुभेच्छा दिल्या. उरण प्रेस क्लब, रायगड जिल्हा पत्रकार संघ, विविध सामाजिक संस्थांनी त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top