हिंदुसम्राट न्यूज
दिनांक 12/6/2026
"उरणच्या उलट्या कोंबड्यांचा 'योगा क्लास' सुरू, संबंधित प्रशासन मात्र 'झोपेच्या गोळ्या' घेऊन गायब"
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण, 12 जून 2026 (प्रतिनिधी) : उरणमध्ये आता कोंबड्यांना 'योगगुरू' बनवले आहे. रस्त्यावर टेम्पोला 20 ते 30 कोंबड्या 'शीर्षासनात' उलट्या टांगलेल्या असतात. वजन करताना पुन्हा उलट्या करून 'तोलासन' केले जाते आणि मग जागेवरच 'रक्तासन' करून कापल्या जातात. हा 'ओपन एअर कत्तलखाना' भाजी मार्केटशेजारी 'फ्री डेमो' देत असून इतका 'आरोग्यदायी कार्यक्रम' सुरू असताना या संबंधित प्रशासन मात्र 'गाढ झोपासनात' गेल्याची खोचक चर्चा उरणकर करत आहेत.
PCA Act 1960 स्पष्ट सांगतो की प्राण्याला उलटे टांगणे म्हणजे क्रूरता आणि हा दखलपात्र गुन्हा आहे. पण या संबंधित प्रशासनाला वाटत असावे की कोंबड्या तर 'स्वतःहून योगा' करत आहेत, म्हणून टेम्पोसमोरच्या क्रौर्यावर 'कुंभकर्णासन' का करतात, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. "आम्ही 112 डायल करतो, पण या संबंधित प्रशासन येईपर्यंत कोंबड्यांचे 'अंतिम संस्कार' उरकले असतात," असे त्या सांगतात. BNS 325 नुसार 5 वर्षे शिक्षा असूनही या संबंधित प्रशासनाची गाडी 'रस्ता चुकासन' करत असावी.
महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 नुसार सार्वजनिक ठिकाणी कत्तलखाना चालवणे बेकायदेशीर आहे, पण या संबंधित प्रशासनाला वाटते की रस्त्यावर रक्त, आतडी, पिसे पडली तर काय झाले, हे तर 'सेंद्रिय खतासन' आहे. या संबंधित प्रशासनाचे अधिकारी कदाचित 'दुर्गंधी-थेरपी' घेत असावेत. नागरिक म्हणतात की या संबंधित प्रशासनाच्या गाडीचे GPS फक्त 'घंटागाडी' शोधते, कत्तलखाना सापडतच नाही. कदाचित त्यांच्या नकाशात 'उलटा कोंबडी बाजार' नावाचा 'नो-एंट्री झोन' असावा.
या संबंधित प्रशासनाने उरणला येताना AC गाडीऐवजी टेम्पोतून यावे म्हणजे कोंबड्यांचा 'शीर्षासन क्लास' लाईव्ह दिसेल. या संबंधित प्रशासनाने PCA Act ची पुस्तके 'उलटी' झाली असतील तर सरळ करून वाचावीत, कारण कलम 11(1)(d) म्हणजे 'कोंबडी-प्रेम' नाही तर 'गुन्हा' आहे. या संबंधित प्रशासनाने झाडू मारायला येताना नाकाला रुमाल लावू नये, इथला 'नैसर्गिक परफ्यूम' एकदा अनुभवावा. उरणच्या कोंबड्या 'शीर्षासन' करत आहेत आणि या संबंधित प्रशासन 'झोपासन' करत आहे. जेव्हा हे तिन्ही विभाग 'कर्तव्यासन' करतील, तेव्हाच उरणकरांना 'आरोग्यासन' मिळेल. असे उरणकरांचे बोलणे आहे.



