शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 27/5/2026

नेरूळ सेक्टर सहामधील तानाजी मालुसरे क्रिडांगणातील गटारावर झाकणे बसविण्याची मागणी.

नवी मुंबई : हिंदूसम्राट प्रतिनिधी :विरेंद्र म्हात्रे :

 नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणातील गटारावर झाकणे बसविण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.


नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडको वसाहतीच्या मध्यभागी महापालिकेचे तानाजी मालुसरे क्रिडांगण व राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या क्रिडांगणात एक गटार आहे. हे गटर पावसाळी असून त्यावर सिमेंटचे ठोकळे बसवून ते गटार बंदीस्त करण्यात आले आहे. तथापि मागील काही महिन्यांपासून या गटाराकडे महापालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे. या गटारावरील झाकणे विखुरली गेल्याने गटार खुले झाले आहे. उद्यान व क्रिडांगणात येणारे, सकाळ व सांयकाळी वॉकसाठी येणारे खुल्या गटारात कचरा टाकतात व नंतर काही लोकांच्या चुकीमुळे इतरांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.त्यातून डासांचा उद्रेक व साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. आपणास या निवेदनासोबत गटाराची छायाचित्रे जोडत आहोत. संबंधितांना या गटारावर विखुरलेले सिमेंटचे ठोकळे बसवून गटार बंदीस्त करण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top