सुळगावच्या सुपुत्र आदित्य मगदूम यांना पीएच.डी. पदवी; शैक्षणिक क्षेत्रात गावाचे नाव उज्ज्व.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 17/6/2026

सुळगावच्या सुपुत्र आदित्य मगदूम यांना पीएच.डी. पदवी; शैक्षणिक क्षेत्रात गावाचे नाव उज्ज्व.


अप्पाचीवाडी:प्रतिनीधी उत्तम हेलाटे 

सुळगाव येथील सुपुत्र आदित्य बाळासाहेब मगदूम यांना शिवाजी विद्यापीठ यांच्या कडून वनस्पतीशास्त्र  विषयातील संशोधनासाठी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सुळगाव व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, गावाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.आदित्य मगदूम यांनी वनस्पतीशास्त्र क्षेत्रात केलेल्या संशोधनाची दखल घेत विद्यापीठाने त्यांना ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी बहाल केली. संशोधन कालावधीत त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकांमध्ये १५ हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या संशोधन कार्याला शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात विशेष मान्यता मिळाली असून,अनेक अभ्यासकांनी त्यांच्या संशोधनाची दखल घेतली आहे.संशोधनाच्या काळात त्यांना अनुभवी संशोधकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अभ्यासू वृत्ती, सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि संशोधनातील नावीन्यपूर्ण दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.आदित्य मगदूम हे सुळगावचे दिवंगत स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मगदूम यांचे नातू असून, बाळासाहेब मगदूम यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. कुटुंबातील सामाजिक व शैक्षणिक संस्कारांचा वारसा जपत त्यांनी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल सुळगाव ग्रामस्थ, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही त्यांच्या संशोधन कार्यातून समाजाला व विज्ञान क्षेत्राला महत्त्वपूर्ण योगदान मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top